Monday, November 11, 2024

पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र…, शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट

 

पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र…, शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट

cottone rate: राज्यात यंदा सरासरी कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. कापसाला मिळणारा दर अजूनही समाधानकारक नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. परंतु काही छोट्या शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे कापूस विकावा लागत आहे.


पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र..., शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट

राज्यातील अनेक भागात कापसाचे मोठे उत्पादन आहे. कापूस पीक अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेले आहे. यामुळेच कापसाला पांढरे सोने म्हटले जाते. दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. केंद्राचे हमीभाव ७ हजार रुपये आहे. मात्र, कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाचे दर उतरले आहे. खासगी व्यापारी कापसाला ६८०० ते ७ हजार भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहे. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पौंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पौंडवर गेले आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहे.

यंदा कापसाचे नुकसान, जास्त दराची अपेक्षा

नैसर्गिक आपत्तीनंतर उरलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. दसऱ्यापासूनच बाजारात बागायती कापूस दाखल झाला. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे कापसाचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतातून येईल तसा कापूस साठविण्याऐवजी थेट बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहे. त्याचा फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दर कमी दिला जात आहे.

हमीभाव पेक्षा कमी भाव

केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली आहे. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपय हमीभाव जाहीर केला आहे. परंतु खासगी व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

राज्यात यंदा सरासरी कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. कापसाला मिळणारा दर अजूनही समाधानकारक नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. परंतु काही छोट्या शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे कापूस विकावा लागत आहे. खान्देश, विदर्भात कापसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. त्या भागात जिनिंग मील मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

या प्राण्याचे दूध हजारो रुपये लिटर, त्या दूधाचे फायदे आहे तरी काय?

 

Camal Milk: बेरोजगार युवकांसाठी उंटाच्या दुधाची विक्री हा एक चांगला पर्यात आहे. काही लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरु होऊ शकतो. उंट डेअरी फार्मसाठी जास्त गुंतवणूक लागत नाही. तसेच यासाठी मुद्रा लोन सारख्या सरकारी योजनाही उपलब्ध आहेत.

या प्राण्याचे दूध हजारो रुपये लिटर, त्या दूधाचे फायदे आहे तरी काय?
Camal Milk







Camel Milk Benefits: दूध हे सकस आहार आहे. दूधात अनेक पोषक घटक असतात. गाई-म्हशीचे दूध 50 ते 100 रुपयांदरम्यान आहे. परंतु उंटाचे दूध खूप महाग आहे. उंटाचे दूध 3500 रुपये लिटर आहे. त्या दूधाचे अनेक फायदे आहेत. युवकांसाठी हा एक चांगला व्यवसाय आहे. भारतात गुजरात आणि राजस्थानमध्ये उंट फार्म बनवून उंटाच्या दूधाची विक्री शक्य आहे

भारतात उंटाचे दूध राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळते. आरोग्यासाठी हे चांगले असते. त्यामुळे आता त्याची मागणी वाढत आहे. देशातच नाही तर विदेशातही ते लोकप्रिय होत आहे. या दूधाची किंमत वेगवेगळ्या बाजारानुसार 3,500 रुपये प्रतिलिटर आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर, हे आहेत घटक

उंटाचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि लोहासारखे पोषक घटक असतात. हे मानवी शरीराला शक्ती देते. त्यातील पोषक घटकांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या दुधाला मोठी मागणी आहे. हे दूध आपली रोगप्रतिकार क्षमता देखील वाढवते. ज्या लोकांना दूध प्यायल्यानंतर पोटाचा त्रास होतो. त्यांच्यासाठीही उंटाचे दूध चांगले आहे. कारण त्यात लॅक्टोजचे प्रमाण कमी असते. याशिवाय, काही संशोधनानुसार, मधुमेहाच्या रुग्णांसाठी उंटाचे दूध देखील फायदेशीर ठरू शकते.

विविध कंपन्यांकडून दुधाची खरेदी

राजस्थानसारख्या राज्यात उंटाच्या दुधाचा दर प्रतिलिटर 3,500 रुपयांपर्यंत जातो. अनेक औषध कंपन्या उंटाचे दूध खरेदी करतात. कारण त्याचे आरोग्यसाठी अनेक फायदे आहेत. हे दूध चॉकलेट, चीज, स्किन क्रीम आणि साबण यासारखी उत्पादनांमध्ये वापरले जाते.

बेरोजगार युवकांसाठी उंटाच्या दुधाची विक्री हा एक चांगला पर्यात आहे. काही लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरु होऊ शकतो. उंट डेअरी फार्मसाठी जास्त गुंतवणूक लागत नाही. तसेच यासाठी मुद्रा लोन सारख्या सरकारी योजनाही उपलब्ध आहेत. व्यवसाय सुरु करण्याआधी बिजनेस मॉडल, मार्केट एनालिसिस आणि त्याचे फायनेंशियल प्रोजेक्शन्स आणि रिस्क असेसमेंट समजून घेणे महत्वाचे आहे. या उद्योगासाठी काही इक्विपमेंट आणि प्रोसेसिंग कंटेनर तसेच मशीनही लागणार आहे.


पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र…, शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट

  पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र…, शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट cottone rate: राज्यात यंदा सरासरी कापसाचे उत्पादन समाधानक...